|  दर्पणकार
                                      आचार्य बाळशास्री जांभेकर यांचे स्मारक, पोंभुर्ले
                                      विजयदुर्ग-तरेळे मार्गावर तरळयापासून सुमारे
                                      18 कि.मी. अंतरावर पोंभुर्ले फाटा आहे. तेथून
                                      3 कि.मी. अंतरावर वाघोटण खाडीच्या काठावर मराठी
                                      वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पण कार आचार्य बाळकृष्ण
                                      जांभेकर यांचे स्मारक आहे.
 आचार्य जांभेकर यांचे बालपण पोंभुर्ले येथे गेले. त्यांना 14 भाषा अवगत
          होत्या. विविध विषयांवर त्यांनी 13 ग्रंथ लिहिले आहेत. जस्टीस ऑफ पीस ही
          पदवी देऊन ब्रिटीशांनी त्यांचा सन्मान केला होता. दि. 6 जानेवारी 1832 रोजी
          मुंबई येथून मराठी-इंग्रजी संमीश्र दर्पण पाक्षिक आणि दिनांक 10 मे 1840
          रोजी मराठीतले पहिले दिग्दर्शक मासिक सुरू केले. जांभेकर यांचे दिनांक 17
          मे 1846 रोजी निधन झाले.
 त्यांचे स्मारक असलेले पोंभुर्ले येथील ठिकाण एक सुंदर देखणे सभागृह आहे
          त्या ठिकाणी जांभेकरांचा ब्राँझचा अर्धपुतळा आहे. तेथे त्यांच्या चरित्राची
          आणि कार्याची माहिती आधुनिक पध्दतीने चित्रीत केली आहे. आत भिंतीवर दर्पण
          आणि दिग्दर्शन च्या पहिल्या अंकाच्या मुखपष्ठाचे फोटो, चित्रे, जांभेकरांचे
          काही लेख, त्यांचे हस्ताक्षरातील लेख लावण्यात आले आहेत. बहुतेक त्यांची
          सर्व पुस्तकेही तेथे आहेत. आता तेथे जांभेकर ग्रंथालय, अतिथीगृह, उद्यान
          करण्याचा समितीचा मानस आहे.
 
 आता तेथे नियमितपणे दि. 06 जानेवारी रोजी पत्रकार दिन समारंभ व राज्यस्तरीय
          दर्पण पुरस्कार वितरण सोहळा आणि 17 मे रोजी दर्पणकारांच्या पुण्यातिथीनिमित्त
          आदरांजलीचा कार्यक्रम होत असतो.
 
 सध्या सर्व ठिकाणचे सर्व राज्यस्तरीय नागरीक आणि पर्यटक भेट देत आहेत.
 |