मुंबई-गोवा
राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून 12
कि.मी. अंतरावर देवगड तालुक्यातील कोर्ले हे
छोटेसे गाव आहे. या गावावर निसर्ग सौंगर्याने
मुक्त उधळण केली आहे. खारेपाटण-कोर्ले-मुटाट-सौंदाळे-पडेल
हा रस्ता विजयदुर्ग-देवगड तसेच विजयदुर्ग-तरळा
मार्गावरील पडेल कॅन्टीन येंथे मिंळतो. हा
संपूर्ण रस्ता सुखशांती नदी आणि पुढे वाघोटण
आणि आंबेरी खाडी किना-याने जात असल्याने बारमाही
वनराईने बहरलेला असतो. या मार्गावरील कोर्ले
गावी श्री ब्रह्मदेव मंदिर आहे. हे पेशवेकालीन
मंदिर आहे. मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते.
हे
मंदिर एकांतात निर्जन ठिकाणी असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
एकमेव प्राचीन ब्रह्मदेव मंदिर आहे. ते एका उंच टेकडीवर
घनदाट वनराईत आहे. सर्व बाजूस या टेकडीवरील वनराई बहरलेली
असते. विलोभनीय दृश्य आणि शांत वातावरणीय ही येथील वैशिष्टये
जंगलात फिरून वनराईचाही आनंद लुटता येतो.
येथे
पाण्याचे भरपूर झरे असन ते बारमाही वहातात. त्यातील बरेचसे
पाणी मंदिराच्या खालच्या बाजूच्या कुंडात साठविले जाते.
येथील वनराईत विविध पशुपक्ष्यांप्रमाणेच इतर प्राण्यांचेही
वास्तंव्य आहे.
या पर्यटन स्थळाची दखल राज्य शासनाने घेतली असून याचा आता आणखी विकास
होईल. त्यामुळे हे पर्यटन नावारूपास येईलच त्याचबरोबर येथे पर्यटकांचा
लोंढाही वाढेल.
|