Contact :  +91-9421142626    |    Email : info@hoteldiamonddevgad.com
   Plan Your Tour   
 
 

Konkan Tourist Guide
देवगड बंदर
   
निपाणी-राधानगरी-फोंडाघाट-नांदगाव-देवगड म्हणून जो राज्यमार्ग ओळखला जातो, तो देवगडला ज्या ठिकाणी संपतो तेच देवगड बंदर होय. देवगड एस.टी. स्थानकापासून 2 कि. मी. अंतरावर देवगड बंदर आहे. स्थानकावरुन बंदराकडे जाताना देवगड शहरातूनच जावे लागते. वाटेत पूर्वेला आनंदवाडी जेटी तर पश्चिमेला देवगड समुद्र किनारा लागतो. येथे उत्तम रस्ता असल्याने पायीच फिरणे उत्तम. सुमारे 1 कि.मी. लांबीच्या खाडीच्या किना-यावरुन रस्ता गेला आहे. वाटेत हिरवीगार झाडी, वेडी वाकडी वळणे, मच्छिमारी नौकांची ये- जा, खाडीतील लहान लहान लाटा, नौकांची गर्दी आणि मच्छिमारांची वर्दळ हे दृश्य अतिशय सुरेख आहे.

देवगड बंदराचे उद्घाटन दि. 3 मे 1958 रोजी झाले. पूर्वी या बंदराला वैभवशाली दिवस होते. सागरी मार्गाने कोकणचे प्रवेशव्दारच म्हणण्यास हरकत नाही. पूर्वी गुजरात, मुंबई, गोवा, मंगलोरहून येथे मालवाहतुक चाले. धान्य, पेट्रोल, रॉकेल,मसाल्याचे पदार्थ, लाकूड कौले, मीठ इ. माल घेऊन शिडाची तसेच यांत्रिक मोठमोठी जहाजे येत असत. तसेच पणजी, मुंबई अशी देवगड मार्गे प्रवासी वहातुकही चाले. रत्नागिरी ते सावंतवाडी आणि देवगड ते कोल्हापूर-सांगलीसाठी हेच बंदर जवळचे आणि सुरक्षित होते. ही वाहतुक म्हणजे कोकण विकासाच्या नाडयाच होत्या. परंतु आता वहातुकीची अन्य साधने उपलबध्द झाल्यामुळे तसेच प्रवाशी वहातुक तोटयात आल्यामुळे या बंदारातून होणारी सर्व प्रकारची वहातुक सध्या बंद आहे.

असे असलेतरी देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे बंदर नैसर्गिकरित्याच मच्छिमारीसाठी अतिशय सुरक्षित असल्याने मच्छिमारी व्यवसायासाठी या बंदराचा उपयोग मोठया प्रमाणात केला जातो. वेळप्रसंगी शिडाच्या तसेच यांत्रिक अनेक छोटया- मोठया नौका, होडया, पाती, ट्रालर,गलबते या बंदराचा आश्रय घेतात. मच्छी हंगामात देवगड समुद्रात मिळणा-या मच्छीची लिलाव पध्दतीने खरेदी-विक्री येथेच केली जाते. यामुळे या व्यावसायातील हे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. मच्छिमारी व्यवसायासंबंधित येथे चार सहकारी संस्था आहेत.

सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्व सोयीनी युक्त, अतयाधुनिक मच्छिमार बंदर म्हणून घ्आनंदवाडी जेटीङ नावाने देवगड बंदर विकसित होत असून त्यासाठी शासनाने कित्येक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे देवगडचा विकास होणार आहेच, शिवाय मच्छिमारी व्यवसायाबाबतही देवगड जगाच्या नकाशावर येणार आहे.
  

Guest Book   |   Photo Gallery   |   Tell-A-Friend
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory A/C - Non A/C
 
 
Veg / Non-veg food With delicious Kokani speciality
Malvani, Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
            © Hotel Diamond, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.