देवगड
एस. टी. बस स्थानकापासून 2 कि.मी. अंतरावर
देवगड किल्ला आहे. अर.बी. समुद्र, आनंदवाडी
जेटी आणि वाडातरखाडी यांच्या संगमावर उभ्या
असलेल्या देवगड किल्ल्यावरुनच या शहराला देवगड
हे नांव देण्यात आले आहे. इ.स. 1705 साली बांधण्यात
आलेल्या या सुंदर किल्ल्याच्या उभारणीत कान्होजी
अंग्रे यांच्या मुलाचा हातभार लागला. सुमारे
120 एकर एवढया विस्तृत क्षेत्र फळामध्ये पसरलेल्या
या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणी केंद्र
म्हणूनच केला जात असे. दि. 7 एप्रिल 1818 रोजी
या किल्ल्याचा ताबा इंग्रजांतर्फे कर्नल इम्लाकने
घेतला. या किल्लयावर फारशा घडामोडी घडलेल्या
आढळत नाही. हा किल्ला अद्याप सुरक्षीत आहे.
किल्ल्यावरील बुरुजापर्यन्त मोठा पुरातन रस्ता असून तो हल्ली डांबरी केला
आहे. आतील पायी जाण्यासाठी रस्ताही उत्तम आहे. या किल्ल्यावर पुरातन श्री
गणेश मंदिर, इ.स.1915 साली बांधलेले दिपगृह तसेच तीन तोफा आहेत. प्राचीन
इमारती नसल्यातरी येथे काही शासकीय इमारती आहेत. किल्ल्यावरुन अथांग सागराचे
सौंदर्य, आनंदवाडी जेटी वाडातर वाडी व खाडीवरील पुल सूर्यास्त, देवगड शहर,
देवगड बीच, पवनचक्क्या पाहणे अप्रतिम म्हणावे लागेल. उत्तरेकडील फणसे-पडवण्याचा
सदाहरितडोंगर पाहताना भान हरवून जाते.
देवगड किल्ल्यावर अतिशय जाज्वल्य, मांगल्यमय अशा स्वयंभू श्री गणेशाचे मंदिर
आहे. येथे भाविकांची सतत गर्दी असते. मच्छिमार आणि गाबित समजाचे हे श्रघ्दास्थान
आहे. येथे मारुती मंदिर सुध्दा आहे. |