|
|
|
|
|
Konkan Tourist Guide |
|
श्री
दिर्बादेवी मंदिर, जामसंडे |
|
देवगड-नांदगांव
मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी.
अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची
श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन
मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत
ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत
आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ
गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर
आहेत. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी
रस्ता आहे.
पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे.
श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या
जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती
भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती
गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात दिर्बादेवी
झाले.
श्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून हातात आयूधे म्हणून
एका हातात सुरा व दुस-या हातात तेलाची वाटी आहे. हे एक सुरक्षित मंदिर आहे.
मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे
नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट
होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची
पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या
दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील
ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत.
कान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरासमोंर
आहे.
हा भव्य परिसर अतिशय रम्य आहे. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|