|
|
|
|
|
Konkan Tourist Guide |
|
श्री
गजबादेवी मंदीर, मिठबांव-तांबळडेग |
|
देवगडपासून
30 कि.मी. असलेल्या मिठगांवपासून 3 कि.मी.
अंतरावर एका टेकडीवर श्री गजबादेवी मंदिर आहे.
येथून तांबळडेग 1 कि.मी. आहे. पश्चिमेला अरबी
समुद्र, अतिशय विशाल व रम्य किनारपट्टी लाभलेल्या
टेकडीवर अतिशय देखणे असे हे मंदिर आहे. हे
मंदिर पुरातन असले तरी मूळ आद्यस्थानाचा जीर्णोध्दार
शालिवाहन शके 1842 रौद्र नाम संवत्सर माघ शुध्द
एकादशी शुक्रवार दि.18 फेब्रुवारी 1921 रोजी
फाटक-मिराशी या गावकरी मंडळींनी केला येथे
प्रतिवर्षी 18 मे रोजी श्री सत्यनारायणाची
महापूजा केली जाते.
या मंदिराच्या उजव्या बाजूला श्री दांडगाईदेवीचे एक छोटे मंदिर असून समोर
भव्य कमान आणि एक आकर्षक दीपमाळ आहे. दीपमाळेवर ध्वज आहे. येथे नवरात्रोत्सव
मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
शेजारीच रम्य तांबळडेग बीच आहे. मंदिर परिसरातून दिसणारा रम्य सागर किनारा,
सुरूचे बन, निळाशार अरबी समुद्र आणि सूयर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखे
आहे. पायथ्याशी सपाट कातळ पसरलेले असून त्यात जीवशास्त्रज्ञांना आकर्षित
करणारे विविध जीव व शैवाल, शंख-शिंपले सापडतात. सायंकाळी 5 वाजल्यानंतर
येथे भेट देणे उत्तम. मंदिराच्या जवळपास गाडीने जाता येते. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|