|
Konkan Tourist Guide |
|
गिर्ये
गोदी |
|
विजयदुर्ग-तळेरे
मार्गावर विजयदुर्ग पासून 3 कि.मी. अंतरावर
आणि देवगड-विजयदुर्ग मार्गावर देवगड पासून
27 कि.मी. अंतरावर गिर्ये गाव आहे देवगड
तालुक्याच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणा-या
वाडातर, मुंबरी
खाडीप्रमाणेच वाघोटण खाडी आहे. अतिशय निसर्गरम्य
असा हा परिसर असून ही खाडी खोल पण सुरक्षित
आहे. त्यामुळे येथे खडक खोदून आरमारी गोदी
उभारण्यात आली आहे. ही गोदी छत्रपती
शिवाजी महाराजांनी बांणली आहे. तेथे जहाज बांधणीचा मोठा कारखाना उभारला
होता. त्याच ठिकाणी आरमारी जहाजे पावसाळयात सुरक्षित ठेवली जात होती.
साधारणपणे मराठ्यांची जहाजे 20 ते 150 टनी असत. मात्र ह्या गोदीची क्षमता
500 टनी जहाजांची होती. सुमारे 106 मी. लांब आणि 70 मी. रूंदीची ही गोदी
उत्तराभ्सिमुख आहे. ही गोदी म्हणजे मराठ्यांच्या विशेषत: छत्रपती शिवाजी
महारांच्या दूरदृष्टीचे प्रतीकच होय. वाघोटण खाडीतील हे नाविक केंद्र म्हणजे
मराठ्यांच्या नौकानयनाच्या इतिहासातील अपूर्व कामगिरी होय. कित्येक इतिहासकार,
संशोधक येथे भेट देत असतात. पर्यटकांनीही मनमुराद आनंद लुटण्यासारखे हे
स्थळ आहे. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|