Contact :  +91-9421632626    |    Email : info@hoteldiamonddevgad.com
   Plan Your Tour   
 
 

Konkan Tourist Guide
खवळे महागणपती, तारामुंबरी
   
देवगड एस.टी. स्थानकापासून दक्षिणेला 2 किमी. अंतरावर तारामुंबरी हे सागर किना-यावरील गांव, डोंगराच्या उतरणीला, नारळाच्या आणि हापूस आंब्याच्या गर्द राईत कोकणातील खेडेगावाची सुंदरता घेऊन नटलेले गांव. या गावात कै. नाना खवळे यांचे घर आहे. तेच खवळे गणपतीचे देवघर होय. याच घरी अनेक वैशिष्टयांने नटलेला गणपती दरवर्षी येतो. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता अतिशय उत्तम आहे आणि कोकणी सौंदर्याची उकल करून देणारा आहे. देवगडहून श्री ब्राह्मणदेव मंदिर, मिठमुंबरी खाडी, मिठमुंबरी किनारा आणि कुणकेश्वर या पर्यटन स्थळाकडे जाताना वाटेतच खवळे महागणपती देवालय आहे. जामसंडे येथील श्री दिर्बादेवीचे हे माहेरघर समजले जाते.

हा गणपती प्रथम इ.स.1705 साली आसनाधिष्ठित झाला. गणपतीचेठिकाण जरी तेच असले तरी त्याची मूर्ती प्रत्येकवर्षा नवीन केली जाते. हे याचे वैशिष्टय आहे्. ही मूर्ती साधारणत: दीड टन वजनाची असते. ती पूर्णत: भरीव असते. हा गणपती प्राचीन असल्यामुळे तो आजच्या प्लास्टर ऑफ पॅरीसच्या जमान्यातही साध्या मातीपासूनच बनविला जातो. ती माती सुध्दा ठराविक स्थानिक ठिकाणातूनच (पळशी-भटवाडी) आणली जाते.

ही माती गणपतीसारखी फार दिखाऊ किंवा रंगरंगोटी केलेली नसते. ढोबळमानानं तिचं आगळं रूपडं काहीसं उग्र भासत असल तरी मूतीर्च्या एकटक दर्शनाने जणू ती आपल्याशी बोलतेच आहे असा भास होतो. प्रतिवर्षी मूर्तीमध्ये किंचितही बदल केला जात नाही. या गणपतीची मूर्ती दरवर्षी एकाच रंगाची, आकाराची आणि उंचीची असते.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी येथील गणपतीची मूर्ती बनवायला सुरूवात करतात. येथील खवळे घराण्यातील पुरूषांनी ही मूर्ती बनवावी लागते. साधारणपणे हा गणपती उत्सव 21 दिवस चालतो. या मूर्तीला गणेश चतुर्थी दिवशी पूजेला बसविताना मूर्तीच्या अंगाला फक्त सफेद रंग लावून डोळे रंगविले जातात. दुस-या दिवशी उंदिर पूजेला ठेवला जातो. तो वेगळया आसनावर असतो. या दुस-या दिवसापासून गणेश मूर्तीच्या रंगकामाला सुरूवात करतात. पाचव्या दिवशी रुगकाम पूर्ण होते. मूर्तीच्या संपूर्ण अंगाला लाल रंग, पिवळया रंगाचे पितांबर, चांदीच्या रंगाचा अंगरखा, डोक्यावर दीड फूट उंचीचा सोनेरी मुकूट, त्यावर पाच फणी नाग, दोन हातावर निळसर शेला अशी ही मूर्ती असते. रंगकाम नित्य नेमाने चालूच असते. शेवटचे रंगकाम विसर्जनाच्या दिवशी दुपारी केले जाते. अशा प्रकारे प्रथम सफेद रंग, नंतर पूर्ण रंगकाम झालेला व शेवटच्या दिवशी पिवळया ठिपक्यांचा अशा वेगवेगळ्या तीन रूपायात साकार होणारा हा जगातील कदाचित पहिलाच गणपती असेल.

या मूर्तीचे विसर्जन मंगळवारी आणि शनिवारी केले जात नाही. विसर्जनाच्या दिवशी दुपारी खवळे घराण्यातील मागील सर्व पिढीतील मृत व्यक्तींना पिंडदान केले जाते. गणपतीच्या बाजूला पिंडदान होणारा हा जगातील पहिलाच गणपती ! असा हा आगळा-वेगळा खवळे महागणपती !!
  

Guest Book   |   Photo Gallery   |   Tell-A-Friend
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory A/C - Non A/C
 
 
Veg / Non-veg food With delicious Kokani speciality
Malvani, Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
            © Hotel Diamond, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.