Contact :  +91-9421142626    |    Email : info@hoteldiamonddevgad.com
   Plan Your Tour   
 
 

Konkan Tourist Guide
श्री क्षेत्र कुणकेश्वर
   
कोकणची काशी समजले जाणारे तीर्थ क्षेत्र, रस्त्याने देवगडपासून 15 कि.मी. अंतरावर आहे. कुणकेश्वर मुंबईपासून 453 कि.मी. तर नांदगावपासून 45 कि.मी. अंतरावर आहे. अरबी समुद्राच्या किना-यावर अत्यंत्ा निसर्गरम्य परिसरात हे स्थळ आहे. तेथे शंकराचे मंदिर आहे. देवगडपासून कुणकेश्वरपर्यंत संपूर्ण रस्ता नागमोडी, घाटाचा आणि आमराईतून गेला आहे. वाटेत माडांच्या आणि चिकूच्या बागाही लागतात. देवगडपासून कुणेश्वर पर्यंत रस्तयाने वहानाने जाण्यास 1 तास लागतो. मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम डांबरी रस्ता आहे. देवगडहून कुणकेश्वरला पायी-पायीही जाता येते. पायी पायी जाण्यास साधारणत: 1 ।। तास लागतो. या मार्गे जाताना 2 कि.मी. आमराइतून गेलेला डांबरी रस्ता, त्यानंतर होडीने ओलांडावी लागणारी सुंदर खाडी, त्यानंतर सुमारे 1 कि.मी. लांबीचा स्वच्छ, पांढरा शुभ्र वाळूचा, निळाशार प्ााण्याचा विस्तीर्ण आणि स्वच्द किनारा आणि उर्वरित प्रवास हा समुद्र किना-यावरून, समुद्र लाटांच्या व मंजूळ आवाजाच्या सानिध्यातून डोंगरातून गेलेल्या पायवाटेचा आहे.

स्वच्छ, सुंदर आणि पांढ-या शुभ्र वाळूची लांबच लांब कातवण गावापर्यंत पसरलेली सुमारे 5 कि.मी. लांबीची किनरपट्टी कुणकेश्वरला लाभली आहे. निसर्गाने कुणकेश्वरला अप्रतिम सौंदर्य बहाल केले आहे. या भागात नारळ, पोफळी, काजूच्या असंख्य राई आहेत. येथे विपुल प्रमाणात मत्स्य संपत्ती आहे. पारंपारिक रापण पध्दतीने येथे मासेमारी केली जाते.

येथील शंकराचे मंदिर म्हणजे शिल्पाकृतीचा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुनाच आहे. अकराव्या शतकाच्या दरम्यान यादवांनी हे मंदिर बांधल्याचा उल्लेख आढळतो. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीचे असले तरी त्यावर कोकणी संस्कृतीचा प्रभाव आढळतो. या मंदिराच्या शिखरावर अनेक शिल्पे आहेत. विशेषत: वेद, भैरू, कामधेनू इ. शिल्पे लक्षणीय आहेत. मंदिरात शिवलिंगाशिवाय पाव्रती मातेचीही मूर्ती आहे. याशिवाय नंदीच्या मागील बाजूस श्री देव मांडलीक मंदिर, समाधी मंदिर तसेच परिसरामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेला डोंगर उतरणीवर इ.स.920 साली गुहा उघडकीस आली आहे. त्याची माहिती या पर्यटन गाईड मध्ये स्वतंत्र दिली आहे.

कोकणातील इतर मंदिराप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणकेश्वर मंदिराला ब-याच वेळ भेटी दिल्याचे संदर्भ आढळतात. त्यांनी या मंदिराच्या जीर्णोध्दारही केला होता. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते.

असे आध्यात्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक, पवित्र ठिकाण सौंदर्याने ओतप्रोत भरलेले आहे. हल्ली येथे पर्यटकांचा लोंढा वाढलेला आहे.
या ठिकाणी रहाण्याकरिता भक्त निवास आहे.
  

Guest Book   |   Photo Gallery   |   Tell-A-Friend
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory A/C - Non A/C
 
 
Veg / Non-veg food With delicious Kokani speciality
Malvani, Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
            © Hotel Diamond, Devgad, Kontan. Developed by  Softkey Solutions.