कुणकेश्वर
मंदिरापासून जवळच पूर्वेला इ.स. 1920 च्या
सुमारास स्थानिक लोक काही सणानिमित्त जमीन
खणत असताना एका गुहेचे द्वार मोकळे झाले.
हे द्वार पावणेदोन मीटर उंच आणि 1 मी. रूंद
आहे.
तेथे काही मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती
इतर गुहेतील मूर्ती प्रमाणे किंवा लेण्याप्रमाणे
भिंतीत कोरलेल्या नसून त्या काळया दगडावर
असून
सर्व मूर्ती सुटया आहेत. लेणे मात्र कोरीव
दगडाचे. 3 मी लांब, 2.7 मी. रूंद आणि 2 मी
उंचीची आहे. आता ह्या मूर्ती गुहे बाहेर
वेगळया करून ठेवलेल्या आहेत. याचे प्रवेशद्वार
दक्षिणेस
तोंड करून असून प्रवेशद्वाराच्या शेजारच्या
काळया दगडाच्या गणेशमूर्ती आहेत.
गुहेच्या मध्यभागी शिवलिंग आणि नंदीची मूर्ती असून त्याच्या सभोवती त्यांचे
उपासक 18 स्री-पुरूषांचे कोरीव मुखवटे आहेत. एका कोनाड्यात एक स्री-पुरूष
जोडी अशा आठ जोडया बसविलेल्या आहेत. यापैकी मधली जोडी आकाराने थोडी मोठी
आहे. या पैकी पूरूष मूर्तीच्या होक्यावर जिरेटोपासारखे शिर आहे. त्यांना
आकडे असलेल्या पीळदार मिशा, टोकदार दाढी आहे. स्री मूर्तीमध्ये केसांचा
बुचडा बांधलेला असून्ा, कानात रत्नांकार आणि इतर भूषणे आहेत.
या मूर्ती सनातन, वैदिक अथवा ब्राह्मण धर्मानुयाची राजघराण्यातील असाव्यात
असे काहींना वाटते. म्हणून त्यांना पांडवलेणी असेही म्हणतात. मात्र येथील
शिवलिंग, नंदी आणि मूर्ती हे कोणाचे, त्यांची स्थापना का केली आणि ती तेथेच
का केली, ती कधी स्थापन केली या बाबत काहीही माहिती उपलब्ध नाही. |