तळेरे5विजयदुर्ग
मार्गावर विजयदुर्ग पासून 24 कि.मी. अंतरावर
वाघोटन गाव आहे. विजयदुर्ग-वाघोटन खाडी, वाघोटन
गोदी, हिरव्यागार वनराइ््रने सजलेल्या आंब्यांच्या
बाबा, कोकणातील सर्वात मोठया आणि दणकट चि-यांचा
खाण व्यवसास या बरोबरच या गावाचे आणखी एक वैशिष्टय
म्हणजे येथील ब्रिटीश कालीन (मराठ्यांचा बंगला)
होय.
सुमारे 165 वर्षापूर्वी बांधलेल्या आणि स्थापत्य शास्राचा उत्कृष्ट नमुना
असलेल्या या बंगल्याची निर्मिती ब्रिटीशांनी अटक केलेल्या थिबा राजाला सन्मानाने
ठेवण्यासाठी ब्रिटीशांनी केले होती. एकूण 13 गोल अाणि चौकोनी आकाराचे अजस्र
खांब, भव्य कमान्या यातून साकारलेल्या या बंगल्याला उत्कृष्ट सागवानी लाकूड
वापरेलेले आहे. ब्रिटीशकालीन आठ हापूस आंब्यांची झाडे अद्यापही आहेत. येथे
त्याकाळीतील विहीर, पडझड झालेला कैदखाना, घोडयांच्या पागा आहेत.
हा ऐतिहासिक बंगला इ.स. 1932 साली होमोओपॅथिक डॉ. माधव कृष्णा मराठे यांनी
लिलावात घेतला. या बंगल्यात आजही त्यांच्या औषधे बनविण्याच्या आणि साठवणीच्या
वस्तू तसेच औषधोपचार व धार्मिक पुस्तकांचा संग्रह देखरेख करणा-यांनी सांभाळला
आहे. दि. 15 डिसेंबर 1994 रोजी डॉ. मराठे यांचे निधन झाले त्यांनेतर त्यांचे
पुत्र शरद मराठे आणि विद्या उत्तम मुधोळकर यांनी या वास्तूचा आधि वास्तूचा
सांभाळ व्हावा म्हणून इ.स. 1995 साली कॅप्टन पी. पेरीग नायगम (त्यांना येथील
लोक अण्णा म्हणतात) व त्यांचे चार मदतनीस यांची नेमणूक केली आहे. ही मंडळी
येथे भेट देणा-यांना माहिती सांगतात. सध्या येथे 20एकर क्षेत्रात 350 आंब्याची
झाडे आहेत. याच बागेत माधव मराठे, कमलाबाई मराठे, अक्का मराठे, कृष्णा मराठे
यांच्या समाधी आहेत.
पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या वाघोटनाला मिळालेला हा अमूल्य ऐतिहासिक ठेवा
म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच होय. |