|
|
|
|
|
Konkan Tourist Guide |
|
मिठबांव-ताबळडेग
सागर किनारा (बीच) |
|
देवगड
पासून 26 कि.मी. अंतरावर मिठबांव, 29 कि.मी.
अंतरावर श्री गजबादेवी मंदीर आणि 30 कि.मी.
अंतरावर तांबळडेग गाव आहे. देवगडहून वरील ठिकाणाकडे
जाताना वेडी-वाकडी वळणे, काही ठिकाणी घाट रस्ता,
वाटेत जागोजागी आमराई, काही ठिकाणी सडामाळ,
कोकण पध्दतीची घरे असणारी 2-3 खेडी, आगळवेगळं
निसर्गसौदर्य लाभलेला पांडवकालीन जागृत देवस्थान
पोखरबांव गणपती, हे विलोभणीय दृश्य पहावयास
मिळते. प्रवासातच कोकण दर्शन होते. संपूर्ण
रस्ता डांबरी असून उत्तम आहे.
तांबळडेग येथेच प्रशस्त आणि स्वच्द असा सुमारे 4 कि.मी. लाबींचा समुद्र
किनारा आहे. हा संपूर्ण सुमारे 250 चौ.किमी. भूप्रदेश वाळूचा आहे. या गावाचे
वैशिष्टय म्हणजे संपूर्ण गावच पांढ-या शुभ्र वाळूत्ा आहे. गावात खडक किंवा
मातीही नाही त्यामुळे रस्ता किंवा गटारे नाहीत. देवगड, कणकवली, मालवण येथून
सतत एस.टी. ची वाहतूक चालू असते.
या किना-यावरील शांतता, रमणीयता आणि भव्यता मोहीता करणारी आहे. जलविहार
आणि जलक्रीडा करण्यासाठी हा समुद्र किनारा आणि खाडी सुरक्षित समजली जाते.
या किना-यावर समुद्र गरूड, सी-गल (किरी) असे पक्षी तर डॉल्फीन सारखे मासे
पहायला मिळतात.तसेच या किना-यावर समुद्र कासवांचे संरक्षण होताना दिसते.
किनारपट्टीवरील, माडांची दाट गर्दी, सुष्ची बने, पांढरी शुभ्र मोत्यासारखी
वाळू, खाडी पलीकडील मोर्वे गावाच्या डोंगरावरील आमराई, निळा फेसाळणारा अथांग
अरबी समुद्र, सागरी पक्षाच्या संथ घिरट्या, दूर दिसणा-या मच्छिमारी नौका
आणि अजस्र मालवाहू बोटी यामुळे किना-याची शोभा आणखीच वाढली आहे. येथे चित्रपटांचे
आणि मालिकांचे चित्रीकरणही होत असते. येथ्ज्ञे रापण या पारंपारिक पध्दतीने
मच्छिम्ाारीही मोठया प्रमाणात चालते.
मिठबांव-मोर्वे जोडणारा या खाडीवर हल्लीच एक सुंदर, प्रशस्त पूल बांधला
आहे. पुलावरून हा संपूर्ण परिसर अतिशय मोहक दिसतो. कुणकेश्वर प्रमाणेच येथील
श्री गजबादेवी मंदिरापासून अरबी समुद्राचे, समुद्र किना-याचे आणि या परिसराचे
दृश्य अप्रतिम आणि मोहक दिसते. मंत्रमुगध करणारा हा परिसर प्रसिध्दविना
दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे तेथे पर्यटकांची म्हणावी तेवढी गर्दी नाही. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|