गणपती
उत्सव, शिमगोत्सवाप्रमाणेच कोकणत नारळी पोर्णिमेला
फार महत्व आहे. येथील बहुतांश लोक विशेषत:
मच्छिमार समाज नारळी पोर्णिमेदिवशी विधीपूर्वक
सागराची पूजा करुन गा-हाणे घालतात. सागराला
नारळ अर्पण करुन नैवद्य दाखवून पारंपारिक
पध्दतीने हा उत्सव साजरा केला जातो. यामुळे
खवळलेला
समुद्र शांत होतो आणि मच्छिमारी करताना धोका
होत नाही. कोणतेही संकट येत नाही, अशी मच्छिमारांची
दृढ श्रध्दा आहे. नारळी पोर्णिमेपासूनच मच्छिमारीला
सुरुवात करतात. मच्छिमार बांधवांप्रमाणेच
या उत्सवात सागर किना-यावर ग्रामस्थही सहभागरी
होतात. यावेळी फटाके उडविणे, नौका सजिवणे,
कोकणी गाणी म्हणणे, विविध खेळ खेळणे, खेळांच्या
स्पर्धा आयोजित करणे इत्यादी कार्यक्रम आयोजित
केले जातात. |