|
|
|
|
|
Konkan Tourist Guide |
|
श्री
रामेश्वर मंदिर, गिर्ये |
|
तळेरे-विजयदुर्ग
मार्गावर विजयदुग्र पासून 3 कि.मी. अंतरावर
गिर्ये हे गांव आहे. येथे पवनचक्की, आंबा संशोधन
केंद्र, ग्रामदैवत श्री चौंडेश्वर देवी मंदिर,
सुप्रसिध्द श्री रामेश्वर मंदिर असल्याने हा
सर्व परिसर पहाण्यासारखा आहे.
पेशवेनाना फडणवीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी हे मंदिर बांधले आहे. मंदिर
साधे, कौलारू असून समोर पाच दीपमाला आहेत. हे मंदिर खोलगट भागात असल्याने
समोरून किंवा मुख्य रस्त्यावरून मंदिर दिसत नाही. आत जाण्यासाठी 150 मी.
लांब, 15 मी. खोल असा जांभ्या दगडाच्या अखंड खडकातून खोदून मर्ग बनविलेला
आहे. मंदिरातील मुख्य गाभा-यात शिवपिंडी आहे. बाहेरील बंदिस्त भागात सुमारे
50 किलो वजनाची शुध्द चांदीची, नंदीवर आरूढ असलेली चतुर्भुज श्री शंकराची
प्रासादिक मूर्ती आहे. ही मूर्ती अतिशय प्रेक्षणीय आहे.
इ.स.1792-93
च्या दरम्यान आनंदराव धुळपांनी जप्त केलेल्या एका परदेशी जहाजावर
अजस्र घंटा सापडली. आनंदराव धुळपांचे वारस कृष्णराव धुळप यांनी
ती घंटा इ.स. 1827 साली रामेश्वरला अर्पन करून मंिदराच्याप्
प्रवेशद्वारावर टांगली असून ती आजहीचांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या
आवारातच उजव्या बाजूला मराठ्यांच्या आरमाराचे सरखेल संभाजी
आंग्रे यांची समाधी आहे. ते शिवभक्त होते. रामेश्वर मंदिरासभोवतालची
दगडी, फरशी सरखेल संभाजी आंग्रे यांनीच बांधली आहे.
मंदिरातील कलाकुसरीचे काम प्राचीन संस्कृतीचा साक्षात्कार आहे. प्रशस्त
बांधणी, प्राचीन चित्रांची आरास मंदिराच्या भव्यतेत भर घालते. मंदिराच्या
भिंतीवर रामायणातील विविध प्रसंगांची अनेक रंगीत चित्रे असून अद्यापही त्यातील
पुष्कळ चित्रांचे रंग चांगल्या सिथतीत आहेत. मंदिरातील नक्षीकाम पहाण्यासारखे
आहे.
तेथील पुरातनकाळाचे साक्षात्कार देणारे देखावे, चोहोबाजूंच्या उत्तुंग कडा,
ऐतिहासिक दस्तऐवज, प्रत्येक पावलावर येथे इतिहासाची वैशिष्टये भरलेली आहेत.
याच मंदिराच्या परिसरात आंग्रेंच्या घराण्यातील सती गेलेल्या सखीची समाधी,
मंदिराच्या चार दिशांचेचार बंगले, मंदिराच्या प्रवेशद्वारी बांधलेली कमान,
भव्य बंगली आणि रामश्वराची मन आकर्षून घेणारी मनोहारी चांदीची मूर्ती या
सर्व गोष्टी म्हणजे ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्हींचा सुंदर संगम होय.
प्रतिवर्षी
महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या शिवाय
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या परिसरातील असंख्य भाविक
रामेश्वराचे दर्शन घेतात. आवर्जून भेट देऊन पर्यटनाचा आनंद
लुटण्यासारखे हे स्थळ आहे.
येथून जवळच श्री चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे.देवीची मूर्ती दक्षिण भारतातील
देवतांप्रमाणे आहे. कोकणात अशा मूर्ती क्वचितच आढळतात. हे विजयदुर्ग-गिर्येचे
ग्रामदैवत आहे. तेथे देवदिवाळी दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो. हा परिसर
अतिशय निसर्गरम्य आहे. |
|
|
|
|
|
|
A/C
Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Non
A/C Room - Double Bed Delux Room
--------------------------------------------
Dormentory
A/C - Non A/C
|
|
|
|
Veg
/ Non-veg food With delicious Kokani speciality
|
Malvani,
Panjabi, Chinees, Tandoori, Fresh Fish
|
|
|
|
|