नांदगांव-देवगड
मार्गावरील नांदगावपासून 13 किमी. अंतरावर
आणि देवगड बंदरापासून 27 किमी. अंतरावर शिरगांव
आहे. येथून साळशी हे गांव 6 किमी. अंतरावर
आहे. हे एक ऐतिहासिक, निसर्गरम्य, आणि इनाम
गांव आहे. सुमारे 300 वर्षांपूवर्भ् पाटण महाल,
कुडाळ महाल प्रमाणे साळस महाल प्रसिध्द होता.
येथे जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे.
येथील एस.टी. बस स्थानकानजिकच सुप्रसिध्द ऐतिहासिक, श्री देव सिद्धेश्वर-पावणाईची
मंदिरे आहेत. ती पूर्वाभिमूख आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये अन्यत्र कोणत्याही
शिव मंदिरात नसेल एवढी मोठी नंदीची मूत्ार्ी या मंदिरासमोर आहे. या मंदिराच्या
चारही बाजूला तटबंदी आहे. येथे अनेक लहान-मोठी मंदिरे आहेत. या पावणाई देवीच्या
अधिपत्याखाली एकूण 84 खेडी येतात. या मंदिरास दिलेल्या प्राचीन सनदांचा
अभ्यास केला असता साळशी गावचे प्रशासन या देवालयांशी केंद्रीत झाल्याचे
आढळते. आजही या देवलयांचा कारभार सनदांप्रमाणे चालतो. ह्या सनदा इंग्रजी
व मोडी भाषेत आहेत. यामुहे ब्रिटिशकालीन आणि स्ांस्थान कालीन अशा प्रशासनचा
एक वेगळा नमुना आपणास पहावयास मिळतो.
या गावाच्या चारबाजूस असलेल्या हिरव्यागर्द दाट जंगलातील वनराई, वा-याने
वेळूच्या बनातून येणारे संगीत, बारमाही वाहणारे निर्मळ व शुध्द पाणी, दाट
जंगलात मनसोक्त लपाछपीचा खेळ खेळणारे नानविध पशु-पक्षी, हिरव्या झाडीत निळे
पिसारे फुलवून नाचणारे मोर, 100 वर्षांपूर्वीचे मोठाले वृक्ष पर्यटकांच्या
मनाला भुरळ घालतात.
येथून 2/3 किमी. अंतरावर तेंडली हे घनदाट अरण्या आहे. येथे बिबट्या, वाघ,
तरस, कोल्हे, सांबर, भेकर, रानडुककर, साळींदर, ससे , शेकरू, घोरपड, माकडे
इत्यादी प्राणी तसेच हिरवा राघू, रानमैना, कवडा, लाव्हा, रानकोंबडी, घार,
लांब मानेचे कावळे, गरूड, धनेश (हॉर्न बिल) इत्यादी पक्षी विपुल प्रमाणात
आहेत. सध्या दुर्मिळ होत असलेला धनेश येथे आढळतो.
साळशी गावापासून 2 किमी. अंतरावर ऐतिहासिक किल्ला सदानंदगड आहे. शिलाहार
भोज राजाच्या साम्राज्यात इ.स. 1100 ते 1200 दरम्यान किंवा विजयनगरच्या
राजांकडून उभारलेल्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला असावा. येथे एक छोटे तळे
आहे. गडावरून दिसणारी नैसर्गिक शोभा अवर्णनीय आहे. गडावर पायवाटेने जावे
लागते. |